शेतकऱ्याचा पोरगा झाला सीए गावकऱ्यांकडून नागरी सत्कार
रेडगाव खुर्द :रेडगाव ता चांदवड येथील गोरखनाथ काळे या शेतकऱ्याचा पोरगा विकास गोरखनाथ काळे याने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अंतिम या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शेतकरी कुटुंबातून विकास हा गावातील पहिला सीए झाल्याने रेडगाव येथील बजरंगवाडी परिसरात विकास चा भव्य नागरी सत्कार गावकऱ्यांकडून करण्यात आला.
विकास सोबतच संदीप बारगळ दिघवद हा विद्यार्थीही सीए परीक्षा उत्तीर्ण झाला. तसेच रेडगाव येथील सुमित नंदू काळे या विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारावी विज्ञान परीक्षेत लासलगाव महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती माजी सभापती अनिल काळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी भाजपा जिप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर डॉ. नितीन गांगुर्डे शिवसेना तालुका संघटक केशव ठाकरे रोहित ठाकरे स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष अंबादास जाधव उपस्थित होते. विकास सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने विकासने येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर (बजरंगवाडी) परिसर सुशोभीकरणासाठी 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी दसरथ काळे भानुदास काळे उत्तम जाधव गोरख घंगाळे विनायक काळे सुनील काळे नवनाथ काळेसर सोसायटी चेअरमन विजय काळे व्हाय चेअरमन हरिभाऊ काळे उपसरपंच संजय काळे रवींद्र काळे अरुण काळे शरद काळे गोटीराम जाधव संजय काळे दत्तू काळे रामदास जाधव गणेश ठाकरे ज्ञानेश्वर काळे सुनील काळे दादाजी काळे शिवराम काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीपक काळेसर यांनी केले.