Maharashtra Rain: आज कुठे आहे पावसाची शक्यता? ऑक्टोबर महिन्यात पावसाची स्थिती काय?

हवामान विभागाच्या मते, पावसाचा जोर कमी झाला असला तरी अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरात सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 6 ऑक्टोबरनंतर पुढील आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 16 ऑक्टोबरनंतर मान्सून निरोप घेऊ शकतो, परंतु चक्रीवादळाच्या हंगामामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पावसाची शक्यता कायम राहू शकते.

दरम्यान, यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. विशेष म्हणजे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पत्रकार -

Translate »