Pik Vima : सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार खरिप २०२३ मधील प्रलंबित विमा भरपाई

राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठीचे प्रलंबित पीक विम्याचे १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत.

खरीप २०२३ या हंगामातील पीक विम्याची १९२७ कोटी रुपयांची प्रलंबित रक्कम राज्यातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूरचा समावेश आहे. ही रक्कम ओरिएंटल कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

पशुधनाच्या विम्याबाबत ओरिएंटल कंपनीला विमा हप्त्याच्या 200 ते 300 टक्के इतकी भरपाई मिळाली होती. त्यामुळे या कंपनीने राज्य सरकारकडे विमा हप्त्याच्या 110 टक्क्यांपेक्षा अधिकची भरपाई देण्याची मागणी केली. ओरिएंटल कंपनीला विमा हप्त्यापोटी एकूण 1255 कोटी रुपये मिळाले होते, तर भरपाई म्हणून त्यांना 3307 कोटी रुपये प्राप्त झाले. यापैकी 110 टक्क्यांच्या प्रमाणात 1380 कोटी रुपये विमा कंपनीकडे राहिले, तर उर्वरित 1927 कोटी रुपये 110 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने राज्य सरकारकडे देण्याची गरज होती.

शेतकऱ्यांना पीक विम्याची १ हजार ९२७ कोटी रुपयांची बाकी रक्कम देण्यासाठी कंपनीने राज्य सरकारकडे आर्थिक मदत मागितली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य करून कंपनीला आवश्यक रक्कम दिली आहे. यामुळे आता या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळण्यासाठीचा मार्ग खुला झाला आहे.

गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरीप २०२३ मध्ये शेतकऱ्यांना विम्याच्या रूपात विक्रमी भरपाई मिळाली. शेतकऱ्यांना एकूण ७६२१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. यापैकी ५४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, उर्वरित १९२७ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

राज्य सरकारने खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून एकूण १९२७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४७० कोटी, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७१३ कोटी, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २.६६ कोटी, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७.७३ कोटी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५८.९० कोटी रुपये मिळणार आहेत.

पत्रकार -

Translate »