हवामान विभागाने राज्यातील पुढील ३ दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे.राज्याच्या काही भागात मागील ५
दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. तर दुसरीकडे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे.
हवामान विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता असून, पावसासोबत विजा आणि ढगांचा गडगडाट देखील होऊ शकतो. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने गुरुवारपासून राज्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज दिला आहे. तसेच, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही काही भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज:
बुधवार: कोकण, मराठवाड्यातील बीड आणि लातूर – हलका ते मध्यम पाऊस.
गुरुवार: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र – हलका पाऊस.
बुधवारी आणि गुरुवारी कोकण आणि काही ठिकाणी मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या उर्वरित भागात पाऊस येण्याची शक्यता कमी आहे.