दिघवद विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली….
श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली.
आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शैक्षणिक सहलींना फार महत्त्वाचे स्थान आहे.ऐतिहासिक, धार्मिक,नैसर्गिक,भौगोलिक पर्यटन स्थळांना भेटी दिल्याने ज्या ठिकाणी ऐतिहासिक,भौगोलिक घटना घडल्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अनुभूती घेता येते. आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक संपन्नतेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात अनेक गड किल्ले लेण्या इतिहासिक वास्तू पुरातन धार्मिक वास्तू यांचा समावेश होतो गड किल्ल्यांना भेटी दिल्याने ज्या ठिकाणी इतिहास घडला त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष अनुभूती घेता येते आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान विद्यार्थ्यांना वाटतो तसेच सहलींमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक जीवनाची गोडी वाढते विद्यार्थ्यांमध्ये संघभावना,शिस्तप्रियता, सहकार्य वृत्ती,नेतृत्व गुण, सामाजिक जाणीव इत्यादींचे संवर्धन सहली मधून जोपासले जावे यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालयाने ओझर,लेण्याद्री, शिवनेरी देहू,लोणावळा उन्हेरे (गरम पाण्याचा झरा) एकविरा माता मंदिर, मुरुड जंजिरा काशीद बीच, अलिबाग इत्यादी ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक स्थळांना भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलीच्या आयोजन केले होते.
शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,पर्यवेक्षक इंद्रभान देवरे,शिक्षक संचालक सदाशिव गांगुर्डे, यांचे मार्गदर्शनाखाली किशोर गांगुर्डे यांनी या सर्व सहलीचे नियोजन केले. त्यात त्यांना अर्जुन गांगुर्डे,शशिकांत पाटील,सुनील गांगुर्डे,संदीप पाटील,प्रभाकर पेंढारी,सुनील चंदनशिव,अमोल ठोंबरे,धनंजय गांगुर्डे,सागर गांगुर्डे,मधुकर गोसावी,साहेबराव घोलप,ओंकार गांगुर्डे,रेणुका कानडे,सुनिता राठोड,जयश्री भामरे,कलुबाई साबळे,रमा नगराळे इत्यादींचे सहकार्य लाभले.
सहलीच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष, चिटणीस सर्व संचालक पदाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बाबत शिक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहण्याची ग्वाही दिली..