त्र्यंबकेश्वर येथे विश्वगुरूं संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या चरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लीन.
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):
त्र्यंबकेश्वर येथे इतिहासात प्रथमच भारत सरकारचे गृहमंत्री मा.श्री.अमितभाई शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पौष वारीचे निमित्ताने सपत्नीक विश्वगुरुंचे दर्शन घेतले.महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना पौष वारीच्या शुभेच्छा दिल्या,यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार सीमा हिरे, आदी उपस्थित होते.यावेळी अमित शहा यांचा सन्मान संस्थानचे अध्यक्ष सौ.ह.भ.प.कांचनताई जगताप,विश्वस्त ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, ह.भ.प.राहुल महाराज साळुंखे,ह.भ.प.श्रीपाद कुलकर्णी,ह.भ.प.नारायण मुठाळ,जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी…. आदींनी केले अशी माहिती संस्थानचे विश्वस्त,प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी दिली.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »