दिघवद ग्रामपंचायत वर पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा… सरपंचांना घातला घेराव

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) येथे सकाळी ग्रामपंचायत वर आदिवासी व दिघवद गावातील महिलांनी पाण्यासाठी काढला हंडा मोर्चा सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांना घातला घेराव गेल्या पंधरा विस दिवसांपासून पाणी पुरवठा योजनेचे 44 गाव योजनेअंतर्गत दिघवद गावाला पाणी पुरवठा न केल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे त्यामुळे संतापलेल्या महिलांनी दिघवद ग्रामपंचायत मध्ये सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांना घेराव घातला व पाण्याची मागणी करण्यात आली पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशी बाचाबाची झाली असता नवनिर्वाचित सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी पाण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना किती फोन केले ते दाखवले यावेळी महिला व ग्रामस्थ मधे एकच चर्चा अशी चालु होती चांदवड तालुक्याचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी एम जी पी च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी मिटिंग घेऊनही अद्याप 44गाव योजनेचे पाणी गावांना मिळत नाहीत अशे तर्क वितर्क करण्यात येत आहेत यावेळी आलेल्या महिलांना व ग्रामस्थांना लवकरच पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न अधिकारी व संबंधित विभागाला सांगण्यात येईल अशे सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी सांगितले असता एक दोन दिवसात पाणी न मिळाल्यास चांदवड पंचायत समिती येथे हंडा मोर्चा काढण्यात येईल असे सांगितले यावेळी सविता हिरे अलका बाई हिरे कमळाबाई हिरे वैशाली कसबे योगिता हिरे मनिषा हिरे शोभा हिरे आशाबाई हिरे अनिता चव्हाण मंगल हिरे अंकिता हिरे रजनी कसबे कमलबाई हिरे या महिला आक्रमक झाल्या होत्या यावेळी सरपंच रावसाहेब गांगुर्डे माजी सरपंच उत्तमराव झाल्टे व संचालक मंडळाने उपस्थित महिलांना उतरे दिली



