चांदवडमध्ये भाजप वर्धापन दिन उत्साहात साजरा — जेष्ठ कार्यकर्त्यांचा आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते सत्कार

चांदवड कैलास सोनवणे : आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या जनसंपर्क कार्यालय, चांदवड येथे भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तालुक्यातील भाजपचे जेष्ठ पदाधिकारी यांचा आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी आपल्या भाषणात आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले, “आजचा दिवस पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांसाठी समर्पित आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहून पक्षाच्या आजच्या यशात त्यांचा वाटा मोठा आहे. या अनुभवी कार्यकर्त्यांच्या खांद्यावरच आज पुन्हा एकदा पक्षाची सत्ता देशभर आणि राज्यात मजबूतपणे उभी आहे.” त्यांनी सर्व जेष्ठ कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर भाजपचे जेष्ठ नेते अशोक काका भोसले, विलास ढोमसे, अशोक काका व्यवहारे, दौलतराव जाधव, माधवराव शिंदे, बाळासाहेब शेळके, सुभाष भवर, तसेच भाजप सरचिटणीस भूषण कासलिवाल, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे, आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याला चांदवड तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



