कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
आवडते मज मनापासून शाळा! लावीती लळा जशी माऊली बाळा! या उक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आपली शाळा,गुरुजन,मित्र याविषयीच्या आठवणी त्यांनी साठवून ठेवलेल्या असतात या आठवणीतूनच स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद शाळेतील2006-2007 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये आपल्या गुरुजनांसमवेत मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे, संस्थेचे विद्यमान संचालक व शिक्षक सदाशिव गांगुर्डे,शाळेचे पहिले माजी मुख्याध्यापक सदाशिव शेडगे, उमाकांत वारके, रमण खुटे, साहेबराव देवरे,सुरेश सोनवणे,किशोर गांगुर्डे,संदीप पाटील तसेच माजी विद्यार्थी संतोष नवले,रेवण गांगुर्डे,सागर झाल्टे,अविनाश पाटील,प्रशांत सोनवणे,किरण ठाकरे,सोमनाथ गाढे,गुलाब बर्डे,अर्जुन गांगुर्डे,प्रविण,स्वप्निल केदारे,विजया जाधव,सुवर्णा देवरे,सोमनाथ देवकाते,सुनील राजनोर,संतोष शिंदे,भूषण निंबाळकर,सदिंप नवले,शिला डोंगरे,उज्वला निंबाळकर,सोनाली गांगुर्डे,ज्योती शिंदे,मोहन भोईटे,ज्ञानेश्वर नवले,संदीप हिरे,अश्विनी गांगुर्डे,शिला गोविंद शिंदे,योगेश शर्मा,निर्मला शिंदे,सिमा आहिरे,छाया हांडगे, दौलतराव हिरे,दत्तू आरतनुर,रोहित कोतवाल,खंडेराव झुराळे,नामदेव मापारी,रोहित शेजवळ,सुनील दगु मापारी,दिपक गांगुर्डे, समाधान भुतणार,किरण मापारी,सचिन साळे,योगेश गांगुर्डे,अमोल निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.या मेळाव्याच्या आयोजनात संतोष नवले,सागर झाल्टे,आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तू आरतनूर यांनी केले.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »