कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) उर्धूळ ता, चांदवड येथे सोमवार 1/9/ते 8/9या कालावधी हभप तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने व हभप भाऊसाहेब महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक 1रोजी पहाटे घटस्थापना व कलश पुजण समाधान महाजन जोशी यांच्या हस्ते तर विनापुजण शंकर नाना ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत दररोज काकडा भजन त्यानंतर भागवत पारायण व सायंकाळी हरी पाठ रात्री 9ते11 किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एक रोजी हभप किरण महाराज बोरशे दि, दोन रोजी समाधान महाराज पगार यांचें यांचे तर तिनला निवुती महाराज काळे यांचे तर दि , चार रोजी नामदेव महाराज गांगुर्डे यांचे पाच रोजी नवनाथ महाराज नाईकवाडे सहा रोजी समाधान महाराज पाटील यांचें सात रोजी सैरभ महाराज जाधव यांचें व सायंकाळी ग्रंथ मिरवणूक दिंडी नगर परिक्रमा होईल व दि,आठ रोजी सकाळी ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद व आरती होऊन सांगता होणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित स्वामी जयदेव पुरी महाराज चंद्रेश्वर गड चांदवड तालुक्यातील संत महंत किर्तनकार प्रवचनकार परिसरातील भजनी मंडळ येणार आहे या कार्यक्रमाला समस्थ भजणी मंडळ व साईबाबा मित्र मंडळ जय बाबाजी परिवार नामदेव महाराज पठाडे मित्र मंडळ तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ सहकार्य करणार आहे.


