कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : चांदवड तालुक्यात दहेगाव शिवारात व मनमाड शहराजवळ कांद्याच्या खळयात काम करणाऱ्या महिलेच्या झोपडीत शिरुन बिबट्याने हल्ला केल्याची घटना काल मध्यरात्री घडली या हल्ल्यात महिलेला गंभीर जखमी करण्यात आल्या असून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत वृत्त असे की चांदवड तालुक्यातील दहेगाव शिवारात मनमाड ते डोंगरगाव रस्त्यालगत कांद्याच्या खड्यात काम करणारे रखवालदार जोडपे होते मध्यरात्री बिबट्याने नर्मदा भडांगे या महिलेवर जडप घालत त्यांना लक्ष केले त्यावेळी त्यांनी बचावासाठी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला मात्र महिला जखमी झाली असून चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या आहेत परिसरात लॉन्स तसेच नव्याने ड्रीम सिटी अस्तित्वात आल्याने व मोठी वस्ती व नागरिक वसाहत असून वर्दळ वाढली आहे अशा परिसरात बिबट्या मुक्त संचार करत आहेत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माझी माझी वन विभागाने तात्काळ बिबट्याला जर बंद करावे अशी मागणी परिसरात करण्यात येत आहे.
