काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार) काजीसांगवीः– येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉटसर्किट मुळे तब्बल दिड महीन्यापासुन वीजपुरवठा खंडीत झाला असुन पुर्ण आरोग्य केंद्रात कर्मचारयांना रुग्ण उपचार साठी अंधाराशी सामना करवा लागत असुन रुग्ण सेवाही विस्कळीत झाली आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत काजीसांगवी सह, सोनीसांगवी, वाहेगावसाळ, उर्दूळ, हिवरखेडे या पाच उपकेंद्रांचा समावेश आहे तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दहा ते पंधरा खेडयावरील 100ते 150 रुग्ण उपचारसाठी येतात तसेच महीन्याच्या प्रत्येक आठवड्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प राबवला जातो परंतु 31 मे रोजी आरोग्य केंद्र परिसरात वीज पडून झालेल्या शॉर्टसर्किटने इमारतीतील सर्व इलेक्ट्रिक वायरिंग जळाल्याने हे आरोग्य केंद्र तब्बल दीड महिन्यापासून अंधाराचा सामना करत आहे तसेच आरोग्य केंद्रातील सर्व इलेक्ट्रिक उपकरणे बंद पडली असल्याने येथील लसीकरण डोस हे तालुक्यातील वडाळीभोई आरोग्य केंद्रातील फ्रिजर मध्ये ठेवण्यात आले आहे लसीकरणाच्या दिवशी येथिल कर्मचाऱ्यांनी वडाळीभोई येथून लसीकरण डोस घेऊन मगच लसीकरण करायचे असा नित्य पाठ सुरू आहे व कुंटुब कल्याण शस्रक्रिया बंद केल्या असुन तसेच आरोग्य केंद्रातील वीजपुरवठा बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळेस होणाऱ्या रुग्णसेवेला अडथळा निर्माण होतअसुन कर्मचारी बँटरी च्या साह्याने उपचार करताना दिसत आहे. तसेच सर्पदंशासारखे गंभीर रुग्ण तालुक्याच्या ठिकाणावर पाठवले जात आहे प्रशासनाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थाचा संताप व्यक्त होत आहे.
बाईट(प्रतिक्रया):–1)काजीसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात मी मागील महीन्यात रात्रीच्यावेळेत उपचार साठी गेलो असता इमारतीची वायरींग जळाल्याने आरोग्य केद्रात पुर्ण अंधार होता येथिल कर्मचारयांनी बैटरी साहयाने उपचार केले हा दुर्दैवी प्रकार असून प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे :-बाळासाहेब ठाकरे (काजीसांगवी)
2) वीज पडून काजीसांगवी आरोग्य केंद्राच्या इमारतीची वायरिंग जळालेले येथील विद्युत पुरवठा बंद असल्याने आरोग्य केंद्र तब्बल दिड महीन्यापासुन अंधारात आहे.सर्व इलेक्ट्रिक उपकरणे बंद पडले असून त्याबाबतचा प्रस्तावही जिल्हा परिषद कडे सादर केला आहे यासाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्हास्तरावरील परवानग प्रलंबित आहे :—डॉ . हेमंत आहेरराव(तालुका वैदयकिय आधिकारी)

पत्रकार -

By admin

Translate »