चांदवडला पार पडले स्काऊट गाईड संघनायक शिबिर

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :- नासिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या विद्यमाने श्रीमती जे.आर.जी.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावी ते नववी च्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे एक दिवशीय संघनायक,संघ नायिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडेन पावेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नासिक भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा संस्थेचे मुख्य संघटक श्रीनिवास मुरकुटे, कविता वाघ, शाळेचे प्राचार्य लोहकरे, शिबिर प्रमुख बद्रीनाथ रायते,केंद्रप्रमुख निवृत्ती बच्छाव,जिभाऊ शिंदे, सुनिल गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
या एकदिवसीय शिबिरामध्ये तालुक्यातील अनेक शाळांमधील स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या शिबिरामध्ये स्काऊट ध्वजारोहण पद्धती, स्काऊट चळवळीचा इतिहास, प्रार्थना,नियम,वचन, झेंडा गीत, गाठींचे प्रकार,प्रथमोपचार जिल्हा मेळावा,राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार,जांभोरी,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रम या संदर्भाने उपस्थित मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

पत्रकार -

Translate »