दिघवद येथे सोयाबीन शेती शाळा संपन्न
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड तालुक्यातील दिघवद येथे शुक्रवार दि. 19/09/2025 रोजी सोयाबीनची शेती शाळा आयोजित करून त्यात शेतकऱ्यांना एकात्मिक किड व रोग नियंत्रणाचे धडे देण्यात आले गावातील कांताबाई गांगुर्डे यांच्या शेतात घेण्यात आलेल्या शेती शाळेत सोयाबीन पिक परिसउंस्था आणि एकात्मिक किड व रोग नियंत्रणविषयी सखोल माहिती देण्यात आली यावेळी सहाय्यक कृषी अधीकारी संगीता मिसाळ यांनी शेतकऱ्यांच्या नियंत्रित प्लॉट व प्रात्यक्षिक प्लॉट मधील पिकाची पाहणी केली आणि पिकाच्या वाढीचे निरीक्षण केले एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा वापर करून रासायनिक कीटक नाशकांचा वापर कमी कसा करता येईल यावरही चर्चा करण्यात आली
