शेतकऱ्यांच्या अडचणी नसल्यास पाटचारीचे चे काम पूर्ण करू:–आमदार डॉ.राहुल आहेर
कृषी न्यूज उत्तम आवारे काजीसांगवी:- पुणे गाव कालव्याच्या पाण्याचा उपयोग चांदवड तालुक्याला दुष्काळग्रस्त गावांना जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी तालुक्यातील परसुल ते गंगावे पाटचारीचे काम करावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली असता.या पाटचारीला शेतकऱ्यांची अडचण नसल्यास पाटचालीचे काम लवकरच पूर्ण करू असे उदगार आमदार राहुल आहेर यांनी दिघवद येथील येथे आयोजित केलेल्या पाटचारी संदर्भातील बैठकीप्रसंगी बोलताना काढले .
पुणेगाव कालव्याचे पाणी दरसवाडी मध्ये पूर्ण क्षमतेने पडून पूर पाणी दरसवाडी पासून येवला तालुक्यात कालव्याने वाहत आहे या पाण्याचा उपयोग तालुक्यातील ठराविक गावांनाच होत असून कायमस्वरूपी दुष्काळ पी असलेल्या गावांना या पाण्याचा उपयोग करण्यासाठी पुणेगाव कालवा संघर्ष समितीने 2009 ते 12 या दरम्यान परसुल ते गंगावे पाटचारीच्या माध्यमातून उताराने हे पाणी गंगावेपर्यंत नेऊन तालुक्यातील 15 पाझर तलाव भरले जातील व हजारो एकर क्षेत्राला या पाण्याचा उपयोग होईल या येथूने 2011 मध्ये पाटबंधारे मंत्री अजित पवार नंतर सुनील तटकरे यांना पत्र व्यवहार करून सर्वे केला होता परंतु तालुक्यातील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी या कामाला कुठलेही पाठबळ मिळाले नाही म्हणूनच सत्ताधारी पक्षाचे आमदार राहुलआहेर यांच्या पुढाकाराने परसुल ते गंगावे वाटचालीचा प्रश्न मार्गी लागेल व तालुक्यातील परसुल ,बोपाने, उर्दूळ, तिसगाव, हिवरखेडे, न्हनावे, पन्हाळे, विटावे, गंगावे, व काजीसांगवी सोनी सांगवी चा काही भाग आदी गावातील शेतक्षेत्राला पाण्यायाचा उपयोग होईल अशा आशयाने गाव प्रतिनिधींनी व शेतकऱ्यांनी दिघवद येथे पाट चारी संदर्भात बैठक आयोजित केली होती या बैठकीत प्रतिनिधी म्हणून लाभ क्षेत्रगावातील शेतकरी कैलास खैरे , पिंटू भोईटे, श्रीहरी ठाकरे , अमर मापारी, ह. भ. प. नामदेव गांगुर्डे, कचरु गांगुर्डे,आदिनी मनोगत व्यक्त केले .तसेच परसुल येथील पुनेगाव कालवा संघर्ष समीतीचे अध्यक्ष तुकाराम सोनवणे यांनी या पाटचारी विषयी आमदार आहेर यांना सविस्तर माहिती सांगितली.यामध्ये परसुल पासुन पाटचारीने पूर्ण उताराने पाणी गंगावेपर्यंत जात असेल यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी नसेल तर लवकरच सर्वे करून काम चालू करू असे आश्वासनही उपस्थिताना आमदार आहेर त्यांना दिले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे पं.स.सदस्य डॉ.नितीन गांगुर्डे ,अँड.शांताराम भवर, शरद पवार, अमर मापारी,पिंटु भोयटे, गावचे सरपंच रावसाहेब गांगुर्डे सोसायटीचे चेअरमन पोपटराव गांगुर्डे आर व्ही पाटील राजेन्द्र हांडगे, श्रीहरी ठाकरे, गणपत ठाकरे, पोपट गांगुर्डे ,
बाईट:–पुणेगाव कालव्याचे पाणी तालुक्यातील दुष्पकाळी गावाना मिळाले यासाठी परसुल पासून गंगावे पर्यंत पाटचारीने पाणी मिळावे ही मागणी पुणेगाव कालवा संघर्ष समिती 2009 पासून करत आहे परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी या कामाला पाठबळ मिळाले नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार राहुल आहेर यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून पूर्व भागातील दुष्काळी गावांना या पाण्याचा उपयोग करून दिला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल ::—तुकाराम सोनवणे (अध्यक्ष पुणेगाव कालवा संघर्ष समिती)
**चांदवड तालुक्यातील परसुल ते गंगावे पाटचारीचे काम होणे गरजेचे आहे परंतु हत्याड धरणापासुन ते पुनेगाव कालव्याच्या पाणीप्रश्नावर अनेक लोकप्रतिनिधीनी निवडणुका लढवल्या तीच पुर्नवृत्ती या पाटचारी च्या मुद्दयावर होऊ नये हि अपेक्षा आहे नाहीतर निवडणुका आल्या कि तालुक्यातील असे पाणी प्रश्न पेटतात– कैलास पगार (दिघवद शेतकरी)
