काजीसांगवीः उत्तम आवारे जिल्हा परिषदसेमी इंग्रजी शाळा पन्हाळे येथे माझी शाळा माझा अभिमान या अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काजीसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय राजेश उबाळे हे होते .प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर आत्मारामजी कुंभार्डे हे होते .माजी सरपंच श्री विजय कुंभारर्डे ,माजी विद्यार्थ्यांमध्ये पन्हाळे गावाचे सरपंच श्री बाबुराव कुंभार्डे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य माजी विद्यार्थी डॉअमोल कुंभार्डे आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,शाळेचे पालक वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते .यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी असलेल प्रेम तसेच आस्था याविषयी भावनिक मनोगत व्यक्त केले .यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .शाळेच्या या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले .शाळेसाठी सदैव मदतीस तत्पर आहोत असे आश्वासन सर्वांनी दिले .आपापल्या क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री उत्तम आवारे ग्रामपंचायत सदस्य श्री विजय आवारेश्री प्रवीण जाधव श्री महेश