कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :निंमगव्हाण ता चांदवड चांदवड तालुक्यातील निमगव्हाण गावात माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती मंगलाताई दरेकर सेवानिवृत्त शिक्षिका यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनाने केली तसेच आलेल्या मान्यवरांचा शाल व ग्रंथ देऊन स्वागत केले माजी विद्यार्थी नितीन दरेकर अजित दरेकर ह भ प माधव महाराज जाधव , शांताराम गायकवाड ग्राम आधिकारी देविदास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले नितीन दरेकर यांनी जिल्हा परिषद शाळा म्हणजे माजी मातृदेवता आहे या शाळेच्या संस्कारामुळे मी आज उच्च पदावरती काम करतो तसेच या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना संस्कारित केले व आदर्श नागरिक घडविले म्हणून माझी पहिले गुरु ही शाळा आहे तसेच ह भ प माधव महाराज जाधव यांनी मी आज दूरवरून माझ्या आईला म्हणजे जिल्हा परिषद शाळेला भेटण्यासाठी आलो असे विशद केले कार्यक्रम प्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करावा अशी मागणी केली शाळेच्या प्रगतीसाठी पाहिजे ते सहकार्य करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी व मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहण्यासाठी शालेय परिसरात सुसज्ज असे वाचनालय सुरू करण्यासंदर्भात शांताराम गायकवाड यांनी सूचना मांडली त्यास श्रीमती मंगला ताई दरेकर यांनी वाचनालयसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी विद्यार्ध्यानवर सुसंस्कार करण्यासाठी शाळा हे एक उत्तम माध्यम आहे असे विषद केले कार्यक्रमासाठी उपसरपंच नागेश ठोबरे , श्री दिगंबर दरेकर (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती निमगव्हाण ) , सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक कैलासजी हनुमंत गोधडे, दिनकरराव इंगळे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निवृत्ती पा दरेकर ,श्री ठकाजी चौगुले ,देविदास गायकवाड, प्रवीण जाधव ,भागूजी जाधव , देवमन पवार ,बापू दरेकर ,नितीन दरेकर सह व्यवस्थापक महाराष्ट्र सहकारी बँक मुबंई ,अरुण दरेकर, अजित दरेकर ,सौरभ दरेकर ,कैलास पवार, शरद जाधव, गोकुळ वटाणे ,सुनील पवार ह. भ. प. शंकर बाबा दरेकर , समर्थलॉन्स चे संचालक अंबादास जाधव, केशव दरेकर अंबादास दरेकर , देविदास शिंदे ,नितीन पवार ,बाळू जाधव ,ह भ प रतन महाराज ठोंबरे, सरला पवार ,बंडू देविदास वडनेरे ग्राम अधिकारी देविदास शिंदे, अशोक गोधडे संदीप जाधव ,जगन जाधव संपत बाबा जाधव ,देविदास शिंदे सुभाष गायकवाड ,सागर जाधव जानकी पवार, कार्तिक जाधव दिगंबर दरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांताराम गायकवाड यांनी विषेश प्रयत्न केले कायक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्रीमती अलका बोरसे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक शांताराम हांडगे यांनी केले पसायदान व दिवाळी फराळ करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली


