कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)शुक्रवार , दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२५
पोलीस अधिक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस ठाणे आयोजित…
” RUN FOR UNITY “ मॅरेथॉन…
चांदवड येथील बी.एस.एन.एल. ऑफिस,गणूररोड येथे पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील व श्री बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनात… अनेक महाविद्यालये, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत ‘ रन फॉर युनिटी ‘ करीता धावले. ‘ रन फॉर युनिटी ‘ करीता तरूणाईने उदंड प्रतिसाद दिला. विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी सर्वांना प्रोत्साहन दिले. विजेते – मुले १) प्रथम – अनिकेत जाधव २) द्वितीय – निखिल ठाकरे ३) तृतीय – निलेश पवार विजेते – मुली १) प्रथम – अर्चना पवार २) द्वितीय – वैष्णवी जाधव ३) तृतीय – पुनम केदारे या विजेत्यांना… श्री बाजीराव महाजन साहेब यांनी विजेत्यांना पारितोषिक प्रदान केले. आयोजक चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.




