कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवडः- येथील महाराजा सुरजमल जाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी वंदे मातरम गीतास १५० वर्ष पूर्ण होत असल्याने राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य विद्यापीठ व कौशल्य विकास केंद्रानं मध्ये वंदे मातरम गीतगायन, देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य संदीप भदाणे यांनी दिली.

सदर कार्यक्रमास शासन निर्णय आयटीआय-२०२५/प्र.क्र १५० व्यशी-३ दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ नुसार या कार्यक्रमासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मा. तहसीलदार चांदवड हे आहेत व इतर सदस्य उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमास सहभाग नोंदवावा असे आव्हान प्राचार्य संदीप भदाणे, गटनिदेशक श्रीरत्न बरडे, योगेश जोशी यांनी केले आहे.

पत्रकार -

By admin

Translate »