Search for:
  • Home/
  • कृषीन्यूज/
  • देवळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ठिय्या आंदोलन

देवळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ठिय्या आंदोलन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)

देवळा – स्थानिक प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने आज देवळा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत शेवाळे यांनी केले.

या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), प्रहार संघटना तसेच विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी उपस्थित

ठिय्या आंदोलनाच्या प्रसंगी तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थिती:

शिवसेना (उ. बा. ठा) तालुकाप्रमुख प्रशांत शेवाळे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव

राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष पंडित निकम

प्रहार संघटनेचे उमेश आहेर

याशिवाय मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थितांमध्ये:

विश्वनाथ गुंजाळ, गोरख गांगुर्डे, सुनील शिंदे, दादा माकोडी, विलास शिंदे, विजय आहेर, सोमनाथ शिंदे, खंडू जाधव, ईश्वर निकम, भरत देवरे, भास्कर आहिरे आदींचा समावेश होता.

तहसीलदारांना निवेदन सादर

या आंदोलनानंतर तहसील कार्यालयात भेट देऊन तहसीलदार अहिरराव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पत्रकार -

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required

Translate »