Search for:
  • Home/
  • कृषीन्यूज/
  • दिघवद येथे दोन बालकांसह वडिलांची आत्महत्या – परिसरात हळहळ

दिघवद येथे दोन बालकांसह वडिलांची आत्महत्या – परिसरात हळहळ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
दिघवद येथे आज सकाळी झालेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी दौलत रामभाऊ हिरे (वय अंदाजे 38) यांनी घरगुती वादातून आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी घरात किरकोळ वाद झाल्यानंतर दौलत हिरे यांनी मुलगी प्रज्ञा (वय अंदाजे 10) आणि मुलगा प्रजवल हिरे यांना घेऊन शेतातील विहिरीत उडी मारून जीवन संपवले.

घटनेदरम्यान झालेल्या आरडाओरड्यानंतर गावकऱ्यांनी विहिरीपाशी धाव घेतली. चांदवड पोलिस निरीक्षक कैलासराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, ग्रामस्थ आणि पाणबुडी जवानांच्या साहाय्याने प्रथम मुलगी प्रज्ञा हिचे, त्यानंतर दौलत हिरे व मुलगा प्रजवल यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिन्ही मृतदेहांना पोस्टमॉर्टेमसाठी चांदवड येथे पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत.

 परिसरात हळहळ

गावातील प्रतिष्ठित कर्मचारी असलेल्या हिरे कुटुंबाच्या या दुःखद अंतामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. नातेवाईक, ग्रामस्थांचा मोठा जमाव विहिरीजवळ आणि रुग्णालयाच्या परिसरात जमा झाला होता.

पत्रकार -

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required

Translate »