पिकांना रासायनिक खते या प्रमाणे द्यावी
पिकांना रासायनिक खते देताना गोंधळून जाऊ नका
■अगदी सोप्या पद्धतीने काढा खतांची मात्रा जेवढ्या किलोची गोणी आहे त्याला मिश्रण प्रमाणाने गुणाकार करा म्हणजे त्यातील अन्नद्रव्य किती आहे ते कळते.
उदा: 12:32:16 (50 किलोची बॅग)
तर
50 × 0.12 =6 किलो N नत्र असते
50× 0.32 =16 किलो P स्पुरद असते
50 × 0.16 =8 किलो K पालाश असते
●सरळ खतात खालील प्रमाणे अन्नद्रव्य असतात
1. युरिया मधे ४६ % नत्र,
2. सिंगल सुपर फोस्फेट (SSP) मधे १६% स्फुरद
3. म्युरेट ऑफ पोटॅश मधे ६०% पालाश
उदा. यूरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश वापरुन १ हेक्टर मका पिकासाठी आवश्यक असलेल्या खतांचे प्रमाण कसे वापरावे
▪︎महात्मा फुले कृषी विद्यापिठ यांनी शिफारस केलेली मात्रा-
१२०किलो नत्र , ६०किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश
●युरिया मधे ४६ % नत्र असते.
५०×०.४६=२३
म्हणजेच ५० किलो वजनाच्या युरिया गोणीमधे २३किलो नत्र मिळते.
१ हेक्टर साठी १२० किलो नत्र म्हणजे ५०किलो युरिया च्या ५ ते ६ गोण्या (२५०किलो युरिया)
(अलिकडे यूरिया चे पोते हे ४५ किलो चे असल्यामुळे,
४५×०.४६=२०.७किलो.)
●तसेच सिंगल सुपर फोस्फेट (SSP) मधे १६% स्फुरद असते (यात ११% सल्फर, २१% कॅल्शियम आणि खनिजे असतात)
२५किलो सिंगल सुपर फोस्फेट मधे ४किलो स्फुरद मिळते
२५×०.१६ = ४ कि.स्फुरद
म्हणजे १ हेक्टर साठी १५ गोण्या सिंगल सुपर फोस्फेट (३७५ किलो)
●म्युरेट ऑफ पोटॅश मधे ६०% पालाश असते.
५० किलोच्या गोणीमधे ३० कि. पालाश मिळते
५०×०.६०=३० कि.पालाश
१ हेक्टर साठी १ते १½ गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश (७५किलो)
अश्या प्रकारे आपण खतांचे प्रमाण काढू शकता.
●खरीप पिके व त्यांचे शिफारस केलेले अन्नद्रव्याचे प्रमाण(किलो/ हेक्टर)-
पिके नत्र: स्पुरद: पालाश
१. ज्वारी (सिंचित) ८०:४०:४०
२. बाजरी ६०:३०:३०
३.मका १२०:६०:४०
४.भात १००:५०:५०
५.भुईमूग i)कोरडवाहू २०:४०:०
ii) सिंचित २५:५०:०
६.सूर्यफूल ६०:३०:३०
७.तीळ २५:१२:०
८.खुरसणी (कारळे) २०:०:०
९.तुर २५:५०:०
१०.मुग २५:५०:०
११.उडिद २५:५०:०
१२.कापूस
i)देशी आणि अमेरिकन ५०:२५:२५
(सिंचन विरहित)
ii)सिंचन विरहित कापूस ८०:४०:४०
iii)सिंचित कापूस १००:५०:५०
-दिपाली सोनवणे