हरभऱ्याचे विविध वाण

harbhara

harbhara

विजय (Phule G -81-1-1)
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● जिरायत: 85 ते 90 दिवस, बागायत: 105 ते 110 दिवस.
● जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15,सरासरी:14.00 क्विंटल ,बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-40 क्विंटल , सरासरी: 23.00= क्विंटल,उशिरा पेर प्रायोगिक उत्पन्न:= 16-18 क्विंटल ,सरासरी: 16.00.क्विंटल
● जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणी करीता प्रसारित केला आहे.
● मररोगास प्रतिकारक्षम असून, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता.

जाकी ९२१८
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● हा देशी हरभऱ्याचा अतिटपोर दाण्याचा वाण आहे.
● हा वाण लवकर परिपक्व होणारा (१०५ ते ११० दिवस) आणि मररोग प्रतिबंधक आहे.
● सरासरी उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे._
● हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे._
● हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला._

दिग्विजय
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● जिरायत: 90 ते 95 दिवस, बागायत: 105 ते 110 दिवस.
● जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15 क्विंटल,
सरासरी: 14.00 क्विंटल, बागायती प्रायोगिक उत्पन्न :35-40 क्विंटल ,सरासरी: 23.00 क्विंटल, उशीरा पेर प्रायोगिक उत्पन्न: 20-22 क्विंटल सरासरी: 21.00 क्विंटल.
● पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य.
● महाराष्ट्राकरिता प्रसारित.

साकी 9516
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● सरासरी 105 ते 110 दिवस
● बागायती  प्रायोगिक उत्पन्न:30-32 क्वि.सरासरी: 18-20 क्वि.
● मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत  पेरणीस योग्य.
● महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यांकरिता प्रसारित.

विशाल
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● सरासरी 100 ते 115 दिवस.
● जिरायत प्रायोगिक उत्पन्न:14-15क्वि,सरासरी: 13.00  क्वि,बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-35 क्वि,सरासरी : 20.00 क्वि.
● आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव.
● महाराष्ट्राकरिता प्रसारित.

विराट
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● सरासरी 110 ते 115 दिवस.
● जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 10-12 क्वि,सरासरी: 11.00 क्वि, बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32 क्वि.सरासरी: 19.00 क्वि.
● काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव.
● महाराष्ट्राकरिता प्रसारित.

बीडीएनजी 797
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● सरासरी105 ते 110 दिवस
● जिरायत: 14-15 क्विंटल,बागायत: 30-32 क्विंटल
● मध्यम आकाराचे दाणे मराठवाडा विभागासाठी प्रसारित.

पीकेव्हीके 2
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● सरासरी110 ते 115 दिवस.
● बागायत सरासरी: 16-18  क्विंटल.
● अधिक टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

 ★ पीकेव्हीके 4
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● सरासरी105 ते 110 दिवस
● बागायत सरासरी: 12-15 क्वि.
● जास्त टपोरे दाणे असणारा काबुली  वाण
● महाराष्ट्राकरिता प्रसारित.

गुलाबी हरभरा ( गुलक- १ )
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● टपोऱ्या दाण्याचा वाण, मुळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक.
● दाणे चांगले टपोरे, गोल व गुळगुळीत असतात.
● फुटाणे व  डाळ तयार करण्यास उपयुक्त.

हिरवा हरभरा (पीकेव्ही हरिता )
◆ वाणाची वैशिष्ट्ये:
● दाण्याचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो. उसळ, पुलाव करण्यास उत्कृष्ट.
●हा वाण ओलिताखाली लागवडीसाठी योग्य.
● मर रोगास प्रतिकारक.
● उत्पादन सरासरी २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्टर आहे.
टीप: (बहुतांशी वाण बाजारात उपलब्ध आहेत तसेच इतर वाणाकरिता कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र, तत्सम बियाणे मंडळाकडे संपर्क करावा.)

पत्रकार -

Translate »