कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
दिघवद वार्ताहर:- स्वामी विवेकानंद विद्यालयातील स्काऊट विद्यार्थी व स्काऊट प्रमुख सुनिल गांगुर्डे हे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे सुरु असणाऱ्या ग्रॅड फिनाले व19 व्या स्काऊट गाईड राष्ट्रीय जांबोरीत सहभागी झाले असून त्यात त्यांनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सुरु असणाऱ्या ह्या महामेळाव्यास देशभरातून तसेच शेजारील देशातून हजारो स्काऊट व गाईड मुले,मुली उपस्थित असून या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध प्रकारचे उपक्रम जांबोरी स्थळी आयोजित करण्यात आलेले आहे. त्यात प्रमुख्याने पायोनियरींग, सांस्कृतिक कायक्रम, शारीरीक कसरतींचे खेळ, गॅझेट उभारणी, फुड प्लाझा, शोभायात्रा इत्यादी. विद्यालयातील यातील अनेक स्पर्धात भाग घेऊन चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले.ह्या मेळाव्यात प्रामुख्याने स्काऊट गाठींचा कौशल्यपूर्ण वापर करून नासिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार बनविले. यात त्यांना नासिक स्काऊट जिल्हा संस्थेचे मुख्य संघटक श्रीनिवास मुरकुटे यांचे सहकार्य व स्काऊट शिक्षक सुनील गांगुर्डे,राहुल पगारे,किरण शिंदे,यांचे मार्गदर्शन मिळाले. ह्या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्याचे आकर्षक प्रवेशद्वार बनविले.हे प्रवेशद्वार अनेकांच्या आकर्षणाचे ठिकाण बनले.त्यामुळे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळाला. तसेच नाशिक जिल्ह्याच्या वतीने झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडविले. व इंटरनॅशनल नाईट मध्ये कार्यक्रम सादर करण्याची संधी महाराष्ट्राच्या वतीने नाशिक जिल्हयाला मिळाली.तसेच ह्या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे ठरले. शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी सांधुची वेशभुषा करून येणाऱ्या नाशिक कुंभमेळाव्याचे दर्शन घडविले.यामध्ये शाळेतील शुभम मापारी,आदित्य मापारी,विनीत देवरे,सार्थक पवार,गौरव गांगुर्डे,निखिल नवले, प्रतीक गाडे,अर्जुन ठाकरे इत्यादी विद्यार्थी सहभागी झालेले होते. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, उपाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे,चिटणीस आण्णासाहेब गांगुर्डे,शाळा समिती अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.गांगुर्डे, पर्यवेक्षक के.पी.गांगुर्डे,अर्जुन गांगुर्डे, प्रभाकर पेंढारी, सुनील चंदनशिव, गणेश गांगुर्डे, संदीप पाटील आदींनी कौतुक केले.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »