श्रीनगर: लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. लेहमध्ये आंदोलकांनी दगडफेक आणि जाळपोळ करत भाजप कार्यालयाला आग लावली. या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले आहेत.
सोनम वांगचुक यांनी उपोषणाचा १५ वा दिवस पार केला होता, परंतु लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी उपोषण संपवले. भाजपने काँग्रेसवर आरोप केला आहे की या हिंसाचारामागे काँग्रेस नगरसेवक फुंटसोग स्टॅनजिन यांचा हात आहे. वांगचुक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, काँग्रेसमध्ये इतका प्रभाव नाही.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चार प्रमुख मागण्या आहेत: लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, घटनात्मक सुरक्षा, कारगिल आणि लेहसाठी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती, आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना संधी मिळावी.