कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) वार्ताहर:-‘अमर रहै अमर रहै किशोर ठोके अमर रहै’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमत तालुक्यातील पाटे येथील वीर जवान किशोर अंबादास ठोके यांच्यावर शासकिय इतमामात अत्यसंस्कार करत अखेरचा निरोप दिला.
तालुक्यातील पाटे येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले किशोर अंबादास ठोके(30)हे जम्मु काश्मिर मधील कुपवाडा येथे कर्तव्य बजावत असताना दि.12 रोजी हदयविकाराच्या तीव्र झटकयाने त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्याचे पार्थिव दि.14 रोजी3.30 वाजेच्या सुमारास मुळगावी पाटे येथे दाखल झाले. रस्त्यावरील गावांमध्ये ग्रामस्थांनी रस्त्यावर रांगोळ्या काढून वीर जवानाच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.अनेक ठिकाणी वीर जवानास श्रध्दांजली अर्पण करणारे बँनर लावले होते.तसेच गावातील तरुणांनी गावातुन वीर जवानाच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्याचे उत्तम नियोजन केले. होते त्यानुसार कोलटेक फाटा या ठिकाणावरून आपल्या लाडक्या जवानाच्या पार्थिवाची भव्य मिरवणुक निघाली.अमर रहै किशोर ठोके अमर रहै, भारत माता की जय ,वंदे मातदम अशा घोषणानी परिसर दुमदुमवुन गेला. अंतिम दर्शनासाठी पार्थिव घराजवळ ठेवताच आई ,पत्नी वैशाली,भाऊ तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी हंबरडा फोडल्याने उपस्थितांना अश्रू अनावर झाले. वीर जवानाचे अंतिम दर्शन घेऊन फुलांनी सजविलेल्या रथातुन गावातुन मिरवणुक काढली. गावातील मोकळ्या जागेत अत्यसंस्कार व्यवस्था गावकऱ्यांनी केलेली होती.हा परिसर पुर्ण फुलाच्या माळांनी सजविण्यात आला होता. यावेळी वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी चांदवडचे तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे,चांदवड पोलिस स्टेशन चे पी.आय.कैलास वाघ, जिल्हा सैनिक बोर्डचे ज्ञानेश्वर रोढे,56 आर.आर.चे कर्नल अरविंद, नाशिक जिल्हा त्रिदल संघटनेचे गव्हाणे,प्रदिप गुरव,वीर जवानाचा सैन्यदलातील भाऊ तुषार ठोके,वीरपत्नी वैशाली ठोके,येवला तालुका माजी सैनिक संघटना, चांदवड तालुका माजी सैनिक संघटना,वीर नारी वीर माता संघटना,पाटे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने उत्तम ठोके यांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानास मानवंदना दिली. बंदुकीच्या तीन फेरी झाडून भारतीय सैन्यदल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या जवानांनी मानवंदना दिली तसेच वीरपत्नी वैशाली ठोके यांच्याकडे तिरंगाध्वज व वर्दी सन्मानपूर्वक देण्यात आली. भाऊ सागर ठोके याने पार्थिवास भडाग्नी दिला. शेवटी पसायदानाने ह्या जवानास अखेरचा निरोप दिला. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, विलास भवर, जगन निंबाळकर नितीन गांगुर्डे, मनोज शिंदे, शांताराम ठाकरे,ज्ञानेश्वर ठाकरे,रावसाहेब गांगुर्डे,मनोज शिंदे डॉ. दंवडे उपस्थित होते. वीर जवानास अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »