कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडगव्हाण येथील माजी विद्यार्थी व माजी मुख्याध्यापक कै. शिवाजी धोंडीराम पुरकर यांच्या स्मरणार्थ शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती. सुशीला शिवाजी पुरकर यांच्याकडून शासनाच्या माजी विद्यार्थी माझा अभिमान या उपक्रमांतर्गत शाळेस बाह्यांग व अंतरंग बाला पेंटिंग साठी एक लाख 11 हजार 111 रुपयांची शाळेसाठी देणगी देण्यात आली .
या रंगकामाचे उद्घाटन सरपंच संगीता ताई पुरकर, अध्यक्ष गोकुळ जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी सोसायटी व्हाईस चेअरमन शरद पुरकर माजी सरपंच अंबादास पुरकर , शिक्षक वृंद व समिती सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. किरण जाधव यांनी केले व दानशूर महिला श्रीमती सुशीला पुरकर यांचे शाळेला मदत केल्याबद्दल आभारही मानले.व शालेय रंगकामस सुरुवात करण्यात आली.



