गावकऱ्यांनी चक्क हातांनी गुंडाळला रस्ता

 

कोणत्या इंजिनियरनं बनवलाय हा रस्ता? जर्मन टेक्नोलॉजीनं बनवलेला रस्ता गावकऱ्यांनी हातांनी उचलून बाजूला ठेवला. असा रस्ता पूर्ण आयुष्यात तुम्ही कधी पाहिला नसेल.

खराब रस्ते आणि रस्त्यांमधील खड्डे हे जणू भारतीयांच्या नशिबालाज पूजले आहेत. कारण रस्ता कितीही चांगला असला तरी पावसाची एक सर येते आणि सोबत रस्ता वाहून नेते. हा प्रकार दरवर्षी पाहायला मिळतो. अखेर भारतीयांना कायमच खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो. खरं तर या प्रकरणी आजवर अनेकद आंदोलनं झाली, उपोषणं झाली, हाणामारी सुद्धा झाली पण परिस्थिती जैसे थे. नेते मंडळी खड्डामुक्त रस्त्यांचं आश्वासन देतात आणि आपण ते ऐकत राहातो. पण आता तर या खड्ड्यांना बुझवण्यासाठी एका कंत्राटदारानं नवीनच जुगाड केलाय. त्यानं रस्त्यावर खडी वगैरे न टाकता थेट एक कारपेट अंथरलंय आणि त्यावर डांबर टाकून रस्ता तयार केला. हा रस्ता नागरीकांनी थेट हातांनी उचलून बाजूला केलाय हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही देखील शॉक व्हाल. कारण असा रस्ता आजवर तुम्ही देखील कधी पाहिला नसेल.
ही घटना जालन्याच्या अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी या ठिकाणी घडली आहे. कंत्राटदारानं प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम केलं. हा रस्ता तयार करण्यासाठी म्हणे जर्मन तंत्रज्ञान वापरलं. पण विदेशी टेकनिकने केलेला हा जुगाड नागरीकांनी मात्र गुंडाळून बाजूला ठेवला आहे. साधारपणे रस्ता तयार करताना खडी, वाळू आणि डांबर यांचं मिश्रण वापरलं जातं. जेणेकरून तो रस्ता दिर्घ काळ टिकावा. पण यानं तर कारपेटवर नुसतं डांबर पसरवून काम तमाम केलंय. या रस्त्याचा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा आपल्या डोक्याला हात लावाव. संतापलेले गावकरी सध्या या कंत्राटदाराचा शोध घेत आहेत. 

पत्रकार -

Translate »