IMO-1 / IMO-2 स्थानीय सूक्ष्म जीवाणू
* IMO-1 / IMO-2 स्थानीय सूक्ष्म जीवाणू *
स्थानिक वातावरणात जे जीवाणू प्रदिर्घ कालापासून अस्तित्वमान आहेत ते जीवाणू शेती साठी सर्वोत्तम आहेत कारण ते शक्तिशाली व प्रभावी आहेत. ते जर या स्थानिक वातावरणात टिकून आहेत तर कृतिमरीत्या इतर ठिकाणी तयार केलेल्या सूक्ष्म जीवाणूंपेक्षा अत्यंत बिकट हवामानाच्या परीस्थितीतही जास्त तग धरतील.
सूर्यप्रकाश व तापमान या अवस्थेत उपलब्ध होणारे सूक्ष्म जीवाणू हे सावलीच्या किंवा झाकलेल्या ठिकाणी उपलब्ध जीवाणूंपेक्षा वेगळे असतील. त्यामुळे या जीवाणूंची विविधता साधण्यासाठी आपल्याच शेताच्या विविध ठिकणाहून गोळा करणे जास्त फायदेशीर आहे. तसेच विविध हवामानात गोळा करणे आणि संवर्धन करणेही फायदेशीरच. रसायन विरहीत शेतीत आपण पिकांचे पोषण करत नाही तर मातीचे पालन पोषण करतो व ही समृद्ध माती स्थानिक सूक्ष्म जीवाणूंच्या माध्यमातून पिकांचे पालन पोषण करते.
पिकांच्या वाढीसाठी जमीनीतील मातीची अवस्था सुदृढ असेल तर नैसर्गिक शेतीत अत्यंत चांगल्या दर्जाचे पिक घेता येते. या मातीला पिकांसाठी सुदृढ बनविण्यात सूक्ष्म जिवाणूंचा महत्वपूर्ण सहभाग आहे. हे सूक्ष्म जीवाणू गोळा करून त्यांचे संवर्धन केले जाऊ शकते.
साहित्य
०.५ इच जाड, १२ इंच लांब व ८ इंच रूंद लाकडी बॉक्स (प्लायवूडचा नव्हे) किंवा मातीचे छोटे गाडगे.
शिजलेला भात.
गुळ
स्वच्छ सछिद्र कापड किंवा कागद (पात्राच्या तोंडावर झाकण्यासाठी).
रबर बॅंड किवा दोरी
द्रावण बनविण्यासाठी काचेची बरणी किंवा मातीचे पात्र (किती प्रमाणात बनवणार आहात त्यानुसार योग्य आकाराचे).
प्लास्टिक किंवा बांबूची टोपली.

जीवाणू कसे मिळवावेत
लाकडी बॉक्स अथवा मातीच्या गाडग्या मधे भात टाका. यासाठी स्वयंपाक घरातील उरलेला भात वापरू शकता. टाकताना भात जास्त दाबून भरू नये, बॉक्स किवा गाडग्याचा १/३ भाग वरून मोकळा ठेवावा. भाताच्या शितांमधे काही प्रमाणात हवा खेळती राहणे जरूरी आहे. भात हा जास्त शिजलेला चिगट नसावा. थंड असताना भाताची शिते एकमेकास चिकटू नयेत. भातातील आर्द्रता मातीमधील सुक्ष्म जीवाणूंना आकर्षित करेल.
बॉक्स/ गाडग्याचे तोंड स्वच्छ कागद अथवा कापडाने झाका व त्यास रबर बँड अथवा दोरीने बांधा. वर्तमान पत्राच्या कागदाचा वापर करू नये. कागद किंवा कापड हवा आत बाहेर जाऊ देतात.
शेतात किंवा जंगलात ज्या ठिकाणी भरपूर कुजलेला पालापाचोळा आहे असे ठिकाण निवडा. बॉक्स किंवा गाडगे निम्मे आत जाईल एवढी त्या ठिकाणची माती उकरा व त्यात ठेवा व त्यास पानांनी झाकून टाका.
प्राण्यांपासून रक्षणासाठी त्यावर प्लास्टिक अथवा बांबूची टोपली झाकून ठेवा. पावसाची शक्यता असेल तर टोपलीवर प्लास्टिक कागदाचे आच्छादन ठेवा.
तापमान २० डि.सें पर्यंत असल्यास भातावर जीवाणू जमण्यास ५ ते ६ दिवस लागतात. जर तापमान ३० डि.सें. च्या पुढे असेल तर ही प्रक्रिया केवळ २ ते ३ दिवसात पूर्ण होते. अपेक्षित कालावधीपेक्षा जास्त वेळ झाल्यास भातावर काळे डाग तयार होतात. शिजलेल्या भातावर बुरशीचा थर जमा झाल्याचे दिसून येईल. स्थानीय वातावरणानुसार हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. ही तयार झालेली बुरशी म्हणजेच स्थानीय जीवाणू आहेत. शास्त्रीय भाषेत यांना IMO-1 (Indigenous Micro Organisms-1) असे संबोधतात.
हा बुरशी (जीवाणू) युक्त भात मातीच्या किंवा काचेच्या बरणीत काढून घ्यावा.
जितक्या वजनाचा भात आहे तेवढ्याच वजनाचा गुळ यात मिसळावा अशा प्रकारे तयार झालेले मिश्रण म्हणजे स्थानीय जीवाणू क्र. २ (IMO-2)

कसे व किती वापरावे
पिकांवर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात १ मि.लि.
पिकांना जमीनीतून किंवा ड्रीपमधून पाण्याद्वारे देण्यासाठी १ लिटर पाण्यात ५ मि.लि.
याच प्रमाणात FFJ (फरमेंटेड फ्रुट ज्युस) सोबत मिसळूनही वापर करता येतो
IMO-3 बनविण्यासाठी.
Source: