Monsoon Update : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला
Monsoon Update : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला
Latest Monsoon News : सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन दिवसांत वेगाने घोडदौड केली आहे.
Monsoon Update Pune : सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन दिवसांत वेगाने घोडदौड केली आहे. एकाच दिवसांत विक्रमी प्रगती करत मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
देशाचा बहुतांश भागांत त्याने धडक दिली आहे. पावसाने रविवारी (ता.२५) देखील महाराष्ट्रातील…..भागांत दमदार, तर…..भागात मध्यम हजेरी लावली. काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
केरळमध्ये ८ जून रोजी डेरेदाखल झाल्यानंतर ११ जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली. ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल १३ दिवस पुढील वाटचाल थांबली होती.
दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू होती. शनिवारी (ता.२४) अरबी समुद्रावरून मॉन्सूनने पुढे चाल केली. कोकण, पूर्व विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सूनने वाटचाल केली.
रविवारी (ता. २५) अरबी समुद्राचा आणखी काही भाग, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड राज्याचा संपूर्ण भागात मॉन्सून पोहोचला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाना, जम्मू- काश्मीरच्या काही भागातही तो दाखल झाला आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा वेरावळ, वल्लभनगर, विद्यानगर, उदयपूर, अंबालापर्यंत आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏