डिजिटल सातबारा : आता तुमच्या सात-बारामध्ये बदल होत असल्यास त्वरित माहिती मिळणार!
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने जमिनीच्या मालकी हक्कात होणाऱ्या बदलांची माहिती त्वरित देण्यासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ नावाची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊन, जमिनीच्या मालकी हक्कात कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित व्यक्तीला SMS आणि ई-मेलद्वारे त्वरित कळविली जाईल. या सुविधेचे [...]