काजीसांगवी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

काजीसांगवी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
काजीसांगवी ( उत्तम आवारे):
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कै नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महान ऋषी ,वेदांची निर्मिती करणारे महर्षी व्यास यांना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर व मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. व्यासपीठावर विद्यालयाचे पर्यवेक्षक सुभाष पाटील,जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर ,दर्शना न्याहारकर,पगारे मॅडम उपस्थित होते.त्यानंतर अक्षरा ठाकरे, साक्षी कासव, पूर्वा ठाकरे,अबोली ठोके या विद्यार्थिनींनी आपल्या
मनोगतातून गुरू पौर्णिमेचे महत्व सांगितले.शिक्षक मनोगतातून माणिक कुंभार्डे यांनी गुरुचे जीवनातील महत्व ,गुरुची मार्गदर्शक म्हणून भूमिका याबाबत माहिती दिली.


याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प व पेन देऊन सर्वांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीने केले व इयत्ता १० वी अ च्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा पठाडे या विद्यार्थिनीने केले तर आभार वैष्णवी आवारे हिने केले .
कार्यक्रमासाठी
सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

पत्रकार -

Translate »