काजीसांगवी विद्यालयात विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

काजीसांगवी (उत्तम आवारे) :– मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या काजीसांगवी येथील कै नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर होते . व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुभाष पाटील,सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर , जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर,दत्तू ठाकरे,चिमाजी गायकवाड,प्रदिप काळे प्रयोगशाळा सहाय्यक आदी उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका देवरे मॅडम यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात विज्ञान छंद मंडळ स्थापन करण्यामागचा हेतू व उद्देश समजावून दिला.
विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आपल्या भाषणात बोलतांना विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे काय व मानवाने विज्ञानाचा वापर कल्पकता वाढवण्यासाठी कसा करता येऊ शकतो, याबद्दल मार्गदर्शन केले . विचारक्षमता,वैज्ञानिक दृष्टिकोन,कल्पकता या सर्व गोष्टी मुलांमध्ये रुजाव्या यासाठी विज्ञान छंद मंडळाची स्थापना केली जाते असे प्रतिपादन केले.प्रत्येक गोष्ट तार्किक पद्धतीने पडताळून मगच ती स्वीकारली पाहिजे प्रत्येक गोष्टी मागे असणारा कार्यकारण भाव जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विज्ञान छंद मंडळ उपक्रमाची माहिती विद्यालयाचे पर्यवेक्षक सुभाष पाटील व सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
अध्यक्षीय भाषणात न्याहारकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलभुत विज्ञानातील विविध तत्वे,संबोध, समजावुन घेवुन त्यांचे सामान्यीकरण करून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे उपयोगात येते हे उदाहरणासह स्पष्ट केले.सी.वी.रमण यांचे संशोधन तसेच व्हॅक्सिन मेकॅनिझम,मेरी क्युरी व त्यांचे शोध व संशोधन तसेच अब्दुल कलाम या शास्त्रज्ञांच्या कार्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो.कल्पकता ही व्यक्तिमत्व विकासासाठी व संशोधकवृत्ती वाढीसाठी किती आवश्यक आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती वाढवावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावे यासाठी विज्ञानाच्या विविध स्पर्धेत सहभाग घेत जिज्ञासू वृत्तीचे दर्शन घडवावे तसेच विविध विज्ञान प्रकल्प भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधांचा अभ्यास करून नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार करावे असेही आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक दिगंबर पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

   फोटो - काजीसांगवी येथील विद्यालयामध्ये विज्ञान छंद मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर.............

पत्रकार -

Translate »