स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिला
स्वातंत्र्य,समता,बंधुत्वाचा संदेश

सोनी सांगवी (प्रवीण ठाकरे): चांदवड तालुक्यातील सोनीसांगवी या गावाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी एकतेचा समन्वय साधून एक आदर्श घालून दिला आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजाचे पुजन गावच्या वयोवृद्ध नागरिक आदिवासी महिला श्रीम. ताराबाई शंकर गांगुर्डे यांच्या हस्ते केले. त्याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण संस्थेत ३८ वर्षे प्रदीर्घ काळ सेवा केलेले सेवानिवृत्त गावचे वयोवृद्ध बौद्ध नागरिक श्री .अशोक नागुजी गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करून उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. असे बहुजन एकतेचे एक गाव एक विचार हेच ध्येय दाखवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण ठाकरे यांनी केले. गावच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.अलका पुंडलिक ठाकरे,,उपसरपंचसौ.मंगल भारत ठाकरे,
ग्रा. पं. सदस्य प्रवीण ठाकरे, श्रीमती छाया ठाकरे, नितीन ठाकरे, किरण ठाकरे, निलेश ठाकरे,सोनी पवार तर श्री काशिनाथ ठाकरे कचरू दादा ठाकरे भास्कर ठाकरे निवृत्ती ठाकरे भाऊसाहेब ठाकरे अरुण ठाकरे राजेंद्र ठाकरे रोहित ठाकरे गौरव ठाकरे गोरख ठाकरे सोमनाथ ठाकरे शांताराम जगताप संदीप जगताप सावळीराम जगताप खंडेराव जगताप लहानू घंगाळे, गोरख घंगाळे आदी ग्रामस्थ सर्व तरुण,महिला, ग्रामस्थ,सहभागी झाले होते..
याप्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री निवृत्ती भिकाजी ठाकरे यांच्या कार्याचा गौरव व सन्मान करून तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. सोमनाथ बाबुराव ठाकरे यांची नव्याने निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे गावचे ग्रामदैवत खंडोबा महाराज मंदिराचे बांधकाम निर्माणासाठी स्वताच्या मालकीची जागा विनामूल्य देणारे सन्माननीय नागरिक श्री शांताराम नामदेव जगताप यांचा शाल व श्रीफळ देऊन ग्रामपंचायत सोनीसांगवीच्या वतीने गौरव करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण ठाकरे यांनी गावातील गरजू महिला व पुरुषांना श्रावण बाळ योजना ,संजय गांधी योजना मंजूर करून दिल्याने वृद्धपकाळात वृद्धांना दरमहा शासकीय मदत मिळणार असल्याने लाभार्थी यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
गाव कल्याणाच्या व विकासाच्या मुद्यांवर समाधानकारक चर्चा करण्यात आली. यात सर्व ग्रामस्थ आनंदाने सहभागी झाले होते.

.

पत्रकार -

Translate »