प्राथमिक आरोग्य काजीसांगवी येथे पदे रिक्त असल्याने होतेय रुग्णांची गैरसोय आहे.

प्राथमिक आरोग्य काजीसांगवी येथे होतेय रुग्णांची गैरसोय आहे.


काजीसांगवी (उत्तम आवारे):प्राथमिक आरोग्य केंद्र काजीसांगवी येथे वैद्यकीय अधिकारी १, ओपीडी एएनएम १,परिचर २, कंत्राटी जीएनएम २असे पदे रिक्त असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गै रसोय होत आहे त्यामुळे तात्काळ वरील रिक्त पदे भरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी असे निवेदन सोनीसांगवीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रविण ठाकरे व श्री.भरत मेचकुल ,शिष्टमंडळाने प्राथमिक आरोग्य केंद्र काजीसांगवीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल विधाते यांना दिले आहे.
एनएचएम अंतर्गत मंजूर पदेही रिक्त आहेत तेही पदे तात्काळ भरून कर्मचारी नियुक्ती करून प्राथमिक आरोग्य केंद्र काजी सांगवी अंतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करावी तसेच पुढील दोन महिन्यांमध्ये एएनएम् १ एल एचव्ही ट्रेनिंगला जाणार असून व एक कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्याही जागी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक करावी जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही.
याबाबत तात्काळ कार्यवाही करून रुग्णांना सेवा द्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत निवेदनावर प्रवीण ठाकरे, भारत मेचकुल, शरद सोनवणे, किशोर सोनवणे, नवनाथ आहेर,ओम वाळके, राजेंद्र ठाकरे ,काशिनाथ ठाकरे लहू सोनवणे, अजय बनकर , आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्रकार -

Translate »