काजीसांगवी विद्यालयात समाजदिन(१९ऑगस्ट) जल्लोषात साजरा

काजीसांगवी विद्यालयात समाजदिन(१९ऑगस्ट) जल्लोषात साजरा

काजीसांगवी (उत्तम आवारे) : मविप्र समाज संचलित कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष दौलतराव ठाकरे होते. व्यासपीठावर उच्च माध्यमिक
शालेय समितीचे अध्यक्ष बाबुराव पांडुरंग सोनवणे व सदस्य , माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दौलतराव ठाकरे व सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,माजी शिक्षण संचालक ए.जे.ठाकरे साहेब,उदय ठाकरे,पोलीस पाटील दिपक ठाकरे,दिनकरराव ठाकरे, पुंजाराम ठाकरे ,प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर,मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील ,तसेच पालक-शिक्षक संघ ,माता- पालक संघ, मविप्रचे सर्व जेष्ठ सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर यांनी केले.त्यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व समाजदिनाचे महत्व विशद केले.यावेळी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाबुराव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले . समाज ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष दौलतराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचा गीतमंच व संगीत शिक्षक यांनी राष्ट्रगीत ,राज्यगीत व समाजगीत सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर स्पर्धांचे उद्घाटन व परीक्षण करण्यात आले . त्यानंतर विद्यालयातील अबोली ठोके,कृष्णा आवारे ,कोमल ढोमसे या विद्यार्थांनी कर्मवीरांच्या योगदानाबद्दल मनोगते व्यक्त केली .शिक्षक प्रतिनिधी म्हणून माणिक कुंभार्डे यांनी मनोगत व्यक्त केले .त्यात त्यांनी १९८२ पासून रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन ‘समाजदिन’म्हणून साजरा केला जातो असे सांगितले.याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात इयत्ता ५वी ते १२ वी त प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तसेच विविध स्पर्धा परीक्षेत गुणवंत विद्यार्थाना गौरविण्यात आले तसेच संस्थेच्या विविध ठेवीदारांचे आभार देखील मानण्यात आले . त्यानंतर अध्यक्षीय मनोगतातून उदय ठाकरे यांनी समाजाप्रती आपण सर्वांनी प्रामाणिक राहून समाज ऋण वक्त केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार माणिक कुंभार्डे यांनी केले .

काजीसांगवी विद्यालयात समाजदिन साजरा करताना उपस्थित सर्व मान्यवर……

पत्रकार -

Translate »