काजीसांगवी विद्यालयाचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम….. संघाची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

काजीसांगवी विद्यालयाचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम…..संघाची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

काजीसांगवीः (उत्तम आवारे) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या काजीसांगवी येथील कै नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवीच्या विद्यार्थिनींनी कबड्डी स्पर्धेत घवघवीत असे यश प्राप्त केले.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने तालुकास्तरीय स्पर्धा काजीसांगवी येथे ३१ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यान घेण्यात आल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये काजीसांगवी विद्यालयाच्या १४ वर्षाआतील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.
या विजयी संघाला क्रीडा शिक्षक जगन्नाथ निंबाळकर,अर्जुन आहेर,सतीश महाले,माणिक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे,चांदवड तालुका संचालक डॉ सयाजीराव गायकवाड ,मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर , माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्करराव ढोके,शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

फोटो - काजीसांगवी विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल संघाचा सत्कार करतांना उपस्थित सर्व मान्यवर...........

पत्रकार -

Translate »