रेडगाव खुर्द शाळेतील गुणवंत विद्यार्थाचे न्यायाधिशांकडु कौतुकन्यायाधिशांनी केला मुख्याध्यापकांचा उस्फुर्त सत्कार

रेडगाव खुर्द शाळेतील गुणवंत विद्यार्थाचे न्यायाधिशांकडु कौतुक
न्यायाधिशांनी केला मुख्याध्यापकांचा उस्फुर्त सत्कार
काजीसांगवीः(उत्तम आवारे)उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुमोटो पथकाकडुन जिल्हा परिषदेच्या शाळाची भौतिक सुविधांची पाहणी करतांना जिल्हा न्यायाधिशांच्या पथकाला रेडगाव खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहुण विशेष कौतुक केले.तसेच विद्यार्थाना 1500 बक्षिस दिले त्यांनी उस्फुर्त पणे मुख्याध्यापक व सहकार्यांचा सत्कार केला आहे.
जि. प. शाळांमध्ये भौतिक सुविधांचा वाऩवा व दुरावस्थेबाबत उच्च न्यायालय के याचिका दाखल झाली आहे. याची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन स्थानिक जिल्हा न्यायाधिशा अंतर्गत सिमित्या निर्माण करुन शाळांची पाहणी करण्यात येत आहे. जिल्हा सत्र न्यायाधिश, पोलीस, महसुल, बांधकाम जि.प.आदी विभागाच्या अधिका-यांची समीती ग्रामीण भागात शाळांची पाहणी करीत आहे.त्यामुसार नुकतेच या पथकाने रेडगावखुर्द शाळेची पाहणी केली.यावेळी सहज विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहण्याच प्रयत्न करता .या दरम्यान खाजगी शाळांना लाजवेल अशी गुणवत्ता पाहुम पथक प्रमुख जिल्हा न्यायाधिश ए.व्ही गुजराथी हे अचंबित झाले.एकीकडे खाजगी शाळांच्या तुलनेत भौतिक सुविधांचा अभाव, आहे त्यात गुणवत्ता नाही फक्त खर्चाचे आकडे लांबलचक तर दुसरे शिक्षकांची कमी , शाळा बाह्या कामे जास्त ही ओरड. अशा परिस्थितीत सर्वकाही आलबेल नाही. आहे त्या सर्व जाबादा-या साभाळुन देखील साधलेली विद्यार्थ्यांची गुणवत्ता म्हणजे असुविधांच्या वाळवंटात गुणनत्तेचा हिरवा मळा सापडला.वेळ कमी असतांनाही जिल्हा न्यायाघिश या गुणवान चिमुकल्यांत तब्बल 45मिनिटे रमले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी उस्फुर्तपणे मुख्याध्यापक सयाजी ठाकरे यांचा शाल देऊन सत्कार केला. सहकार्यांचेही अभिनंदन केले. यावेळी पोलीस जिल्हा न्यायाधिश ए.व्ही.गुजराथीं समवेत पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी,गट शिक्षणाधिकारी संदीपकुमार शिंदे, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे,सा.बा.विभागाचे ग्यानेश्वर ठाकरे, .शिरोडे,केंद्रप्रमुख कौतिक वाकचौरे ,विलास सोणवणे आदी उपस्थित होते.
फोटो-
मुख्याध्यापक सयाजी ठाकरे यांचा सत्कार व सहकारी हेमा मुळणकर,पी.डी.कुवर यांचे अभिनंदन करतांना जिल्हा सत्र न्यायाधीश ए. व्ही गुजराथी, समवेत पोलिस निरीक्षक चौधरी, नायब तहसीलदार केदारे, गटशिक्षणाधिकारी संदीपकुमार शिंदे आदी

पत्रकार -

Translate »