विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीला मिळतोय ९००० रुपयांचा भाव..
विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीचे भाव कमी झाले असून दर गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी घसरले आहे जरी नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहेत. जुन्या तुरीला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.डिसेंबरच्या सुरुवातीला ८७०० ते ९७०० असा दर तुरीला होता. त्यानंतर ९५००, ९०११ असा दर तुरीला मिळाला. आता सध्या ९००० रुपयांनी तुरीचे व्यवहार होत आहे.अकोला बाजार समितीतही दर गेल्या आठवडाभरापासून ८ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. शासनाचा हमीभाव ७००० रुपयांचा आहे.मात्र त्यापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याचे समाधान असले तरी तुरीच्या दराने दहा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. त्याच दराने खरेदी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. व्यापारी मात्र नव्या तुरीत ओलावा अधिक असल्यामुळेच दर काही प्रमाणात दबावात असल्याचे सांगतात.
यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटकात तुरीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मात्र खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक काही प्रमाणात सुरू झाली असून, या नवीन तुरीला प्रति क्विंटलला ९००० हजाराच्या आसपास दर मिळत आहे.यंदा देशातील तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा चांगली वाढ होऊ शकते. पण, त्यासाठी मार्च पर्यंत वाट पहावी लागेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असला तरी उत्पादन कमी असल्याने त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना होईल? हे जानेवारी महिन्यात जेव्हा पूर्ण क्षमतेने बाजारात तूर दाखल होईल त्यावेळीच लक्षात येईल. मात्र सध्या गेल्या दोन ते तीन महिन्यांतील निच्चांकी दर मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.