दिघवद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

दिघवद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. दिघवद वार्ताहर( कैलास सोनवणे)
येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थीनी विविध प्रकारचे संगीत गायन वादन नृत्य व नाटिका पोवाडे तशेंच अभंग गवळणी गोंधळ वात्रटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सभापती अमर सोपान मापारी उपसभापती गोविंद मापारी शिक्षण तज्ञ संदिप पाटील प्रकाश मापारी नामदेव मापारी शाम महाराज गांगुर्डे राजाराम मापारी सुनील गांगुर्डे शंकर निखाडे आनंदा गांगुर्डे अशोक गांगुर्डे रामभाऊ हिरे विक्रम मापारी किरण मापारी विनायक गांगुर्डे आदि व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन शिक्षक प्रकाश बंजारा यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सौ अलका बोरशे यांनी मानले या कार्यक्रमाला पालकांनी भरभरून प्रतिसाद व बक्षिसे दिली या कार्यक्रमाला शिक्षक धीरज पवार सौ संगिता महाले यांनी परिश्रम घेतले

पत्रकार -

Translate »