नाशिकमध्ये मुलांच्या दप्तरात आढळली  घातक हत्यारे, आठ जणांकडून ११ शस्त्रे जप्त..

नाशिक : शहर पोलिसांनी मंगळवारी चार अल्पवयीन मुलांसह आठ जणांकडून ११ धारदार शस्त्रे जप्त केली.
ईएसआयसी रुग्णालयाजवळ शस्त्रसाठा सापडल्याने सोमवारी सातपूर परिसरातून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी क्रांतीनगर येथील महापालिकेच्या बागेजवळ दोन चॉपर आणि एक खंजीर सापडल्यानंतर पंचवटी पोलिसांनी एका अल्पवयीन आणि आणखी एकाला पंचवटीतून ताब्यात घेतले. पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात मंगळवारी आणखी दोन तरुण तीन धारदार शस्त्रांसह सापडले.विशेष म्हणजे पंचवटी, घारपुरे घाट परिसरात दाेघा शाळकरी मुलांच्या दप्तरामध्ये घातक शस्त्रेही पोलिसांना आढळून आली आहेत. मागील चार महिन्यांत नाशिक शहर पोलिसांनी एकुण १४ देशी पिस्तुल, २० काडतुसे, ३१कोयते आणि ११ तलवारी अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत.
गोदापार्क परिसराजवळून क्राइम ब्रँचने (युनिट २) दोन तरुणांना त्यांच्या स्कूलबॅगमध्ये तीन चॉपर घेऊन जाण्यासाठी ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलिसांनी घारपुरे घाट परिसरात त्याच्या बॅगेत तीन चॉपर घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन तरुणावरही गुन्हा दाखल केला. पाथर्डी गावात मंगळवारी इंदिरानगर पोलिसांनी एका अल्पवयीन व अन्य एका तरुणाला दोन शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले. संबंधित लोकांवर भारतीय शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरात विविध उपनगरांमध्ये कोयते, तलवारी, चॉपरसारख्या हत्याराने हल्ले करण्यात आल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. तसेच समाजकंटकांनी वाहनांचीसुद्धा अशाप्रकारे हत्यारांनी तोडफोड केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. अशाप्रकारे दहशत माजविणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे.

पत्रकार -

Translate »