सामाजिक कार्यात झपाटलेले व्यक्तीमत्व म्हणजे समाधान बागल.

सामाजिक कार्यात झपाटलेले व्यक्तीमत्व म्हणजे समाधान बागल.
उत्तम आवारे (काजी सांगवी): आजकाल तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड लागल्याशिवाय अत्युत्तम अशी कामगिरी तुमच्या हातून घडूनच येत नाही हा अनुभव आहे,मग ते कुठलेही क्षेत्र असो.
सामाजिक क्षेत्रात असेच एक झपाटलेले व्यक्तीमत्व म्हणजे नाशिक येथील श्री.समाधान बागल. नाशिक जिल्ह्यात होळकरशाहीच्या पाऊलखुणा जिवंत ठेवत या माणसाने दैदिप्यमान इतिहास जनतेसमोर ठेवण्याचे काम केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा ईतिहास सर्व जनतेसमोर आणण्यासाठी समाधानजी रात्रीचा दिवस करीत आहेत.नाशिक जिल्ह्यात पु.अहिल्या जयंती गावा गावात व घरोघरी साजरा करण्याचे श्रेय श्री.समाधा बागल यांना जाते.अहिल्यादेवींच्या जन्म त्रिशताब्दी वर्षात तिनशे ग्रामपंचायतींना अहिल्यादेवींची मुर्ती भेट देण्याचा संकल्प करून तो अंमलात आणला . आपल्या पगारातील चार आणे हिस्सा समाजकार्यासाठी खर्च करणारा हा अवलिया.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड म्हणजे प्रती चौढी किंवा प्रती इंदूर.पु.अहिल्यादेवींच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेली ही होळकरांची महेश्वर नंतरची उपराजधानी लौकिक दृष्टीने मागे पडली होती.समाधानजी मागील तिन चार वर्षांपासून तेथे मल्हार उत्सव भरवतात , होळकर वाड्यावर(रंगमहाल) रोशनाई करतात,इतिहासकारांचे व्याख्याने आयोजित करतात, मराठेशाहीतील सरदारांच्या वारसदारांचा सन्मान करतात,दिव्यांगांचा सन्मान करुन त्यांना ट्रायसिकल चे वाटप करतात.
अहिल्यादेवींनी बसवलेल्या चांदवड गावातच त्यांचा पुतळा नसावा ही गोष्ट समाधानजी यांच्या मनाला लागणारी ठरली व शासकीय दरबारी पाठपुरावा करुन चांदवड येथे अहिल्यादेवींचे स्मारक व पुतळा व्हावा या करीता पायपीट करत असतात.रंगमहालाच्या नुतनीकरणासाठी पाच कोटी चा निधी सरकार कडून मिळवण्यासाठी राजकारण्यांचे दरवाजे ठोठावतात.
नाशिक जिल्ह्यात पु.अहिल्यादेवींनी बांधलेल्या अनेक विहिरी आहेत ,या विहिरींचा शोध घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी लोकजागृती करण्याचे काम त्यांचे अखंड चालू असते.नाशिक जिल्ह्यात तुकोजी होळकर (द्वितीय) यांचे जन्मगाव आहे तेथे दरवर्षी तिन में रोजी तुकोजी होळकर जयंती साजरी करतात.
नाशिक येथे गोदावरी तिरावर पु.अहिल्यादेवी होळकर यांनी घाट बांधला आहे, काशी विश्वेश्वर मंदिर व अहिल्या राम मंदिर बांधले आहे.दरवर्षी ३१मे रोजी श्री.समाधानजी बागल यांच्या प्रयत्नांतून तेथे संध्याकाळी काशीच्या धर्तीवर गोदा आरती व अहिल्या आरती करण्यात येते.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अहिल्यादेवींनी ईतिहास प्रसिद्ध कुशावर्त बांधले आहे.दरवर्षी अहिल्यादेवी पुण्यतिथीला या त्र्यंबक नगरीत अहिल्यादेवींची पालखी काढून कुशावर्तावर आरती करण्याचा पायंडा श्री.समाधाजी बागल यांनी पाडला.
अहिल्यादेवींच्या जन्म त्रिशताब्दी वर्षात चांदवड या होळकरांच्या उपराजधानीत सहावे धनगर साहित्य संमेलन व्हावे अशी समाधान जी बागल यांची इच्छा होती व त्या अनुषंगाने ११मे रोजी साहित्य संमेलन टिमचा चांदवड दौरा व नियोजन बैठक चांदवड येथे होउन सहावे धनगर साहित्य संमेलन चांदवड येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला व याच्या आयोजनाची जबाबदारी श्री.समाधानजी बागल यांच्याकडे देण्यात आली.
वर्गण्या गोळा करून खिशात घालण्याचे बाहेर वातावरण असतांनाच या माणसाने मागील वर्षाच्या चांदवड येथील होळकर महोत्सवासाठी घरचा दागिना गहाण ठेवण्याचा किस्सा त्यांच्या मित्रमंडळीला माहित आहे.
आपले पारदर्शक कामकाज व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यपद्धती मुळे समाजमनावर त्यांनी गारुड केले आहे.
अशा झपाटलेल्या माणसांमुळेच ईतिहास जागृत होतो,चळवळी जिवंत राहतात व सर्व समाज एकत्र येत असतो.
शब्दांकन -विनायक काळदाते
८२०८५६८५४६
नाशिक
