पीएम सूर्य घर योजनेसाठी घरबसल्या करा ऑनलाईन नोंदणी, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

पीएम सूर्य घर योजनेंर्तगत देशातील एक कोटी कुटुंबाना महिन्याला ३०० या योजनेंतर्गत १ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ३० हजारांचे अनुदान मिळणार आहे. तर २ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ६० हजार आणि ३ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी लावणाऱ्या कुटुंबांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.या योजनेंर्तगत एक कोटी घरांना सवलतीच्या दरात सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.याशिवाय निर्माण होणारी वीज विकून तुम्ही वार्षिक १७ ते १८ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकता.या योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ कोणाला नाही?

सराकरी कर्मचाऱ्यांना या योनजेचा लाभ घेता येणार नाही.
वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त असू नये.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करता आली पाहिजे.

योजनेला लागणारी महत्त्वाची कागदपत्रे –
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
आधार कार्ड
वीज बील
रहिवाशी दाखला
बँक खात्याचा तपशील (पासबुक)
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट आकारचे फोटो

तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही नोंदणी करू शकता.

पुढील पध्दतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.

त्यानंतर होमपेजवर Apply for Rooftop Solar या टॅबवर क्लिक करा.

त्यानंतर आता तुमच्या समोर नवे पेज ओपन होईल. ज्यावर राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनी आणि वीज ग्राहक क्रमांक टाकून Next बटणावर क्लिक करा.

आता तुमच्या पुढे आलेल्या नव्या पेजवर नोंदणी अर्जाचा नुमना येईल. त्यावर आवश्यक ती सर्व माहिती भरून आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.

शेवटी Submit बटणावर क्लिक केल्यावर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

पत्रकार -

Translate »