मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून मिळणार 50 हजार रुपये; जाणून घ्या कसा करायचा अर्ज ..

Majhi Kanya Bhagyashree Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणे राज्य सरकारांकडूनही अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमध्ये मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च उचलला जातो. अशीच एक योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे. अशीच एक योजना म्हणजे ‘माझी कन्या भाग्यश्री’ होय. ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी लागू केली होती.या योजनेंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून 50,000 रुपये मिळतात.या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे, दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे.

मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत किंवा दुसर्‍या मुलीच्या जन्माच्या 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल. कुटुंब नियोजनानंतर सरकारकडून एका मुलीच्या नावे 50,000 रुपये किंवा दुसर्‍या मुलीच्या जन्मानंतर आणि नसबंदीनंतर 25,000-25,000 रुपये बँकेत जमा होणार आहेत.

योजनेच्या प्रमुख अटी :

मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक

कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल

कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी 1 वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक

कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक

एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.

सदर योजनेचा लाभ ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.

ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे.

शासनामार्फत मुलीच्या नावे बँकेत रु. 50,000 मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येतील. (दोन मुली असतील तर प्रत्येकी रु. 25000)

जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी 6 वर्षांची झाल्यावर काढता येईल. त्यांनतर पुन्हा मुलगी 12 वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे-मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.

मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल. (मुलगी दहावी उत्तीर्ण व अविवाहित असावी)

या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल.

दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड

बँक खात्याचे पासबुक

उत्पन्नाचा दाखल

रहिवासी दाखल

मुलीचा जन्मदाखला

पासपोर्ट साइज फोटो

अर्ज करण्याची पध्दत : या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर फॉर्म डाउनलोड करावा. हा फॉर्म काळजीपूर्वक भरा किंवा योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

पत्रकार -

Translate »