मॉन्सून अपडेट: दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात प्रगती, लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता!

अरबी समुद्रातून वाढत्या प्रवाहामुळे, नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, केरळमध्ये आधीच दाखल झालेला मॉन्सून लवकरच महाराष्ट्रातही दाखल होण्याची शक्यता आहे.मॉन्सून केरळमध्ये वेळेआधीच 30 मे रोजी दाखल झाला होता.मॉन्सूनने अरबी समुद्रातून पुढे सरकत संपूर्ण केरळ, तमिळनाडू आणि दक्षिण कर्नाटक (मंगलूरू, चित्रदुर्ग) ते आंध्र प्रदेश (नेल्लूर) पर्यंत पोहोचले आहे. बंगालच्या उपसागरातील काही भागातही मॉन्सूनची प्रगती झाली आहे.आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील दक्षिण जिल्हे आणि पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता (यलो अलर्ट) आहे.उर्वरित राज्यात उन्हाचा तीव्रता कायम असून उष्ण आणि दमट हवामान उत्तर कोकणात.अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली असून.पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसासह मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की मॉन्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल.

पत्रकार -

Translate »