श्री धोंडू संपत जाधव सर 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त
वार्ताहर (कैलास सोनवणे):शनिवार दिनांक 6/ 7 /2024 रोजी श्री धोंडू जाधव सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रेणुका लॉन्स चांदवड येथे भव्य दिव्य व दिमाखदार स्वरूपात पार पडला. श्री जाधव सर यांच्या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. काळूजी बोरसे-पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिरिष कोतवाल (माजी आमदार), डॉ. आत्माराम कुंभार्डे , श्री. निवृत्ती घुले(फौजी नाना) , केदुजी देशमाने, दादाजी सावंत, सौ. चंद्रकला पानसरे, केंद्रप्रमुख श्रीम. जाधव,प्रकाश अहिरे,साहेबराव पवार, किरण गांगुर्डे, शिवाजी शिंदे, श्रीकांत देवरे, मुकुंद भोजने इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सेवापूर्ती कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व शिक्षक बंधू भगिनी जाधव सरांचे आजी-माजी गुणी विद्यार्थी सर्व नातलग ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. व सर्वांच्या साक्षीने श्री जाधव सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दिमाखदार स्वरूपात पार पडला.