सकाळी पोट साफ होत नाही ? जाणून घ्या पोट साफ करण्याचे 6 प्रभावी उपाय..

पोटाच्या तक्रारी, साफ करण्याचे 6 प्रभावी उपाय…..

१) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या किंवा भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या.

२) फायबरयुक्त आहार: फळे, भाज्या, धान्ये, आणि काजू यांसारखे फायबरयुक्त पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा.

३) त्रिफळा एक पावडर आहे ज्यामध्ये तीन प्रमुख औषधी वनस्पती असतात, आमलाकी (आवळा), हरितकी (हरड) आणि बिभिटकी (बहेडा). या सर्व वनस्पती बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास व पोट चांगले साफ करण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या.

४) सब्जा बिया विरघळणाऱ्या फायबरने भरलेले असतात. जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते. हे नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते, ज्यामुळे शौच करताना कोणतीही अडचण येत नाही किंवा जोर टाकून मल त्याग करावा लागत नाही. 1 ते 2 चमचे भिजवलेल्या सब्जा बिया तुमच्या आवडत्या फळांसोबत घ्या किंवा नारळाच्या पाण्यात किंवा सामान्य पाण्यात घालून त्याचे सेवन करा.

५) बद्धकोष्ठतेवर पिकलेली केळी फायदेशीर ठरते. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येत नाही. जर आपण देखील पोट साफ न होण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर, नियमित एक पिकलेली केळी खा.

६) कोणतंही अन्न खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. अधासासारखं अन्नावर तुटून पडू नये. अन्नाचा घास योग्यप्रकारे चावूनच गिळावा.एकाचवेळी तडस लागेल इतकं पोट भरुन जेवू नये. योग्य प्रमाणात पाणी, पातळ पदार्थ आहारात घ्यावेत.

हे उपाय बद्धकोष्ठता सारख्या समस्यांवर उपयुक्त ठरू शकतात.

काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, विशेषतः जर आपल्याला कोणतीही अंतर्गत आजार असतील तर.प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्यामुळे या उपायांचे परिणामही वेगवेगळे असू शकतात.हे उपाय तात्काळ परिणाम देऊ शकतात, परंतु दीर्घकालीन समाधानासाठी आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थ, पाणी आणि व्यायाम यांचा समावेश करणे आवश्यक आहे.गरोदर महिलांनी आणि मुलांनी कोणतेही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


पत्रकार -

Translate »