Kolhapur News: अंबाबाई लक्ष्मी बाजारात ३ कोटींची उलाढाल ; खिलार बैलजोडीची विक्री ९ लाखांमध्ये  पडली पार…

विजयादशमीच्या पहिल्या सोमवारी कोल्हापूरच्या वडगाव बाजार समितीत भरलेल्या जनावरांच्या अंबाबाई लक्ष्मी बाजाराला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या बाजारात सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. यावेळी नायकू महादेव भोसले यांची नऊ लाख रुपये किमतीची खिलार जातीची बैलजोडी सर्वांचे लक्ष केंद्रबिंदू ठरली.

कोल्हापूरचा वडगाव बाजार महाराष्ट्र आणि कर्नाटकसह परिसरात प्रसिद्ध आहे. या बाजारात उत्तम दर्जाच्या बैलजोड्यांसह विविध जातीच्या गायी आणि म्हशी विक्रीसाठी उपलब्ध होत्या. विशेषतः, मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी अशा विविध जातीच्या म्हशी आणि एचएफ, जर्सी, गीर अशा विविध जातीच्या गायींची मोठी आवक होती. या जनावरांच्या किमती चाळीस हजार ते दोन लाख रुपये इतक्या विस्तृत श्रेणीत होत्या.

बाजारात खिलार, माणदेशी, म्हैसुरी अशा विविध जातीच्या बैलांची मोठी आवक होती. या बैलांच्या किमती पन्नास हजार ते चार लाख रुपये इतक्या विस्तृत श्रेणीत होत्या. मोहन चव्हाण यांची चार लाख रुपये किमतीची खिलार जातीची बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेतली. शिवाजी लाड याचा अडीच लाख रुपये किमतीचा मुरा जातीचा वळूही विक्रीसाठी होता. नायकू भोसले यांची बैलजोडी दरवर्षी या बाजारात आकर्षणाचे केंद्र असते. त्यांच्या बैलजोडीला महिन्याला पंधरा हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. गेल्या वर्षी त्यांची बैलजोडी ऋतिक काटे यांनी आठ लाख रुपयांना खरेदी केली होती.

पत्रकार -

Translate »