कैलास सोनवणे (पत्रकार) : चांदवड तालुक्यातील चार महिलांना नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सन्मान देऊन गौरविण्यात आले.
नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळाच्या वतीने वडनेर भैरव येथे शक्ती भक्ती महोत्सवाच्या अंतर्गत चांदवड तालुक्यातील चार महिलांना मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले यात वडाळी भोई येथील श्रीमती भारती बाबुराव जाधव यांना राजकीय क्षेत्रासाठी तर कृषी या क्षेत्रासाठी सौ संगीता गणेश सलादे ग्रामपालिका स्वच्छता कर्मचारी या प्रकारात सौ माया विजय जाधव, कृषी क्षेत्रासाठी सौ सुनीता गणेश सलादे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी वडळी भोई येथील सौ सारिका दत्तात्रय जाधव यांना त्यांच्या क्षेत्रातील कार्याबद्दल प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक त्रिभुवन वडाळीभोई येथील व्यापारी पूनम संचेती, इंदुमती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे, भाजपा नेते बाळासाहेब माळी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
वडनेर भैरव येथे सलादे बाबा दत्त मंदिर या ठिकाणी कुलस्वामिनी जोगेश्वरी माता नवरात्र उत्सवात हा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळाच्या वतीने श्री सुरेश माधवराव सलादे यांनी केले होते यावेळी सूत्रसंचालन लक्ष्मण सलादे, आभार बापू सलादे प्रास्ताविक सुरेश सलादे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र आप्पा मोरे यांनी केले. सत्काराला उत्तर खेडगाव येथील सौ ललिता प्रदीप शेटे यांनी दिले.