रब्बी हंगाम 2025-26 साठी वाढलेली एमएसपी: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पिकांचे आश्वासन

MSP

MSP

KNN नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024 :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम 2025-26 मध्ये सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली.

उत्पादकांना त्यांच्या शेत मालासाठी योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने विपणन हंगाम 2025-26 साठी रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. रेपसीड आणि मोहरीसाठी 300 रुपये प्रति क्विंटल आणि त्यापाठोपाठ कडधान्य (मसूर) 275 रुपये प्रति क्विंटल दराने एमएसपीमध्ये निव्वळ सर्वाधिक वाढ जाहीर करण्यात आली. हरभरा, गहू, सूर्यफूल आणि बार्ली या पिकांच्या एमएसपी मध्ये अनुक्रमे 210 रुपये प्रति क्विंटल, 150 रुपये प्रति क्विंटल, 140 रुपये प्रति क्विंटल आणि 130 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात आली.

विपणन हंगाम 2025-26 मधील सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमती

(रु. प्रति क्विंटल)

S. No.CropsMSP RMS 2025-26Cost*of Production RMS 2025-26Margin over cost(in percent)MSP RMS 2024-25Increase in MSP(Absolute)
1Wheat242511821052275150
2Barley19801239601850130
3Gram56503527605440210
4Lentil (Masur)67003537896425275
5Rapeseed & Mustard59503011985650300
6Safflower59403960505800140

* संपूर्ण खर्च. यात शेतमजुरी, बैलांची मजुरी/यंत्रांचा खर्च, भाडेतत्वावरील जमिनीचे भाडे, बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन खर्च, अवजारे आणि शेत इमारतींवर घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप चालवण्यासाठी डीझेल/वीज हा सर्व खर्च, आणि विविध आणि कुटुंबाचे श्रम हा सर्व खर्च समाविष्ट आहे.

विपणन हंगाम 2025-26 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपीमधील वाढ केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मधील, देशभरातील पिकांच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या घोषणेला अनुसरून आहे.

देशभरातील भारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित फरक, गव्हासाठी 105 टक्के, त्यापाठोपाठ रेपसीड आणि मोहोरी 98 टक्के, डाळी 89 टक्के, हरभरा 60 टक्के, बार्ली 60 टक्के, आणि  सूर्यफूल 50 टक्के इतका आहे.

रब्बी पिकांच्या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला फायदेशीर भाव मिळेल आणि पिकांमधील विविधतेला प्रोत्साहन मिळेल.

पत्रकार -

Translate »